...अन एक जगणं सोडून चाललो होतो आम्ही.

संही एक गाव आहे ,भारतात .ज्या गावाकडे जाण्यासाठी पावसाच्या पडणाऱ्या पाण्याच्या खडतर वाहिवाटने जावं लागतं ,पायऱ्या चढाव्या लागत नाहीत, डोंगरावर,उंचावर जावं लागत नाही.तर खोल दरीत निसर्गाने निर्माण केलेल्या पायऱ्या उतराव्या लागतात.दरीत वसलेले हे गाव मोठ-मोठ्या झाडांनी झाकलेले आहे.खाली गावाकडे उतरत असताना पक्ष्यांचा येणारा आवाज,झऱ्याचा मंद खळखळ आवाज,झाडांच्या पानांचा होणारा भयग्रस्त आवाज,नीरव शांतता, फक्त आमच्याच पावलांचा आवाज,खाली पायऱ्या उतरत उतरत अर्धा तास झाला तर अजूनही वाटत नाही की इतक्या खोलात एक आदिवासी गाव लपलं असेल,जेव्हा डोळ्यांना गाव दिसू लागते तेव्हा मात्र डोळ्यांनाही विश्वास वाटत नाही आपण खरंच स्वप्नात तर नाही ना!

जेव्हा ते गाव स्पष्ट दिसू लागते,तेव्हा मात्र
त्या टुमदार गावाचे रूप पाहून लहानपणीचे गोष्टीतले हेच ते आटपाटनगर तर नसेल ना असं वाटल्याशिवाय राहवत नाही . या गावात येणाऱ्या विविध झऱ्याचे पाणी काचेसारखे स्वच्छ व शुद्ध दिसते.त्या गावचं नाव आहे कँमसाऊ.हे गाव मेघालय राज्यातील इस्ट खाँसी हिल्स या जिल्ह्यात आहे.शिलाँग या शहरापासून 2 तासाच्या अंतरावर आहे.
  
या गावातील घरे लहान आकाराची पण विविध प्रकाराने बांधलेली आहेत.या गावात कोणत्याच नेटवर्क कंपनीला रेंज नाही त्यामुळे हे गाव म्हणजे त्यांच्यासाठी व भेटी देणाऱ्यासाठी एक नवं जग बनून जातं.गावातील लोक सर्व खाँसी भाषा बोलतात.इतक्या दुर्मिळ ठिकाणी असूनसुद्धा जगाच्या आधुनिकेतेबरोबर आहे,प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून नाहीत,येथील महिला घराची जबाबदारी पार पाडतात.लग्न झाल्यानंतर मुलं मुलींच्या घरी राहायला जातात व आडनाव सुद्धा मुलींच्या घरचे लावले जाते,हे विशेष.
 
 ‎येथील सर्व लोक बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवतात.आपल्या महाराष्ट्राचे प्रो.अविनाश शिंदे या गावातील लोकांना आधुनिक पद्धतीने बांबूपासून बनवणाऱ्या वस्तूंचे प्रशिक्षण देतात.ते आयआयटी गुवाहाटीचे प्रोफेसर आहेत.त्यांना भेटून खूप अभिमान वाटला.तेथील लोकांनी केलेले आदरातिथ्य हे कधीच न विसरणारे आहे.त्यांच्या भोजनाचा आस्वाद घेऊन परतीचा प्रवास सुरु केला.
   ‎
   ‎गावाकडे जाण्यासाठी व येण्यासाठी किती खडतर रस्ता असू शकतो ,याचे टोकाचे व आव्हानात्मक उदाहरण प्रवास करताना पाहता आले.जेव्हा या गावातून वर आलो तेव्हा आम्ही एका स्वप्नातून बाहेर पडलो की काय..असं वाटत राहिलं....
 
 ‎...अन एक जगणं सोडून चाललो होतो आम्ही;जिथे नव्हता दवाखाना,जिथे होती फक्त शुद्ध हवा, शुद्ध नैसर्गिक पाणी,पशु-पक्षी यांचा सहवास... जे गात होते खरे ..जीवनगाणे..

#हुनर खोज संवाद यात्रा
#मेघालय

 ‎©Saudagar Kale

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...