तंतूच्या महावस्त्रातून : स्त्री-पुरुष संबंधाचा दिसलेला धागा…..
तंतू ही कन्नड साहित्यिक एस.एल.भैरप्पा यांची कादंबरी. या कादंबरीचा मराठीत अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला.850 पेक्षा जास्त पानांनी भरलेली ही प्रदीर्घ कथा.हे कथानक 1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित करेपर्यंत घडत असते.म्हणजे तेव्हाचा राजकीय संदर्भ हा या कादंबरीचा मुख्य संदर्भ आहे.
मी नुकतीच ही कादंबरी वाचली .एका पत्रकाराचे कुटुंब मध्यवर्ती भूमिकेत आहे.
या कादंबरीत भैरप्पा यांनी ग्रामीण-शहर,चंगळवाद-गांधीतत्वज्ञान वर आधारित समाजरचना,स्वातंत्र्यपूर्व पिढी-स्वातंत्र्योत्तर पिढीचा समाजहितसाठी योगदान देण्याची तफावत,नैसर्गिकपूरक शिक्षण-पाश्चात्य शिक्षण संस्कृती ,विकाऊ पत्रकारिता-निर्भीड ,निष्पक्ष पत्रकारिता, स्वार्थ-निस्वार्थ कर्म, सेक्सवर आधारित नैतिकता,नातेसंबंध, सरकारी नोकरांची भ्रष्टाचार करण्याची मनोवृत्ती, स्त्री मुक्ती-पुरुषीअहंभाव ,धार्मिक,संगीतसाधना,ध्यान-धारणा, अशा विविध विरोधाभास-परस्पर संबंध घटकांचा संच एकत्रित करून निर्माण केलेले सरळ,ओघवते कथानक वाचायला मिळते.
ही कादंबरी वाचल्यानंतर मी कोणत्या दृष्टिकोनातून या कादंबरीकडे बघितले हे प्रतिक्रियाच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.यात खूप घटक आहेत.सर्वांचे मिश्रित लिखाण मांडणे गुंतागुंतीचे होईल ,ते नीट मला सांगताही येणार नाही .हे लक्षात घेऊन सेक्स,स्त्री-पुरुष संबंध,अध्यात्म याच्या आधारे काही यातील वाक्ये आपल्याला विचार करायला लावतात.त्याच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
तत्पूर्वी यातील काही पात्रांची ओळख करून देतो. रविंद्र हे विख्यात देशातील अग्रगण्य अशा एका इंग्रजी वर्तमानपत्राचे बेंगलोर आवृत्तीचे संपादक आहेत.त्यांची पत्नी कांती.मूळची दिल्लीत राहणारी आहे.विवाहानंतर रवींद्रबरोबर बेंगलोर मध्ये राहत असते.त्यांचा मुलगा अनुप.अनुपची पहिली कॉलेजची मैत्रीण रश्मी. दिल्लीतील घटस्फोट घेतलेली सरकारी नोकर असलेली कांतीची मैत्रीण शीतल अन सतारवादक हेमंत हाही मूळचा दिल्लीतला.यांची सर्वांची पार्श्वभूमी मोठी आहे तसेच या कादंबरीत भरपूर उल्लेखनीय पात्रे आहेत पण इथे मी थोडक्यात महत्त्वाचे कामापुरते पात्रे सांगितलेली आहेत.
रविंद्र हा गांधीविचाराचा पत्रकार आहे.सरळमार्गी, सत्याची कास न सोडणारा,भ्रष्टाचाराला थारा न देणारा . एकदा त्याचा मुलगा अनुप मित्रासमवेत कॅबेरे मध्ये मुलींचे डान्स पाहताना पोलीसकडून पकडला जातो.तेव्हा सर्व मुले लहान असतात.अनुपला अशी वाईट सवय लागू नये म्हणून तो खेड्यातील गुरुकुल सारख्या गांधी-विवेकानंद यांच्या विचारावर चालणाऱ्या विद्याशाळेत घालतो.हे त्याच्या पत्नीला कांतीला पटत नाही. झपाटणाऱ्या बदलणाऱ्या जगात हा आपल्या मुलाला गावंढळ करत आहे अशी भावना कांतीच्या मनात वाढीस लागते.यातून तिचे रविंद्रबरोबर सतत भांडण होत राहते. एकदा कांतीच्या वडिलांचा दिल्लीतील घरी वाढदिवस असतो.तेव्हा सर्व नातेवाईक एकत्र येणार असतात.तेव्हा तिला एकटीला तो दिल्लीला स्लीपरचे तिकीट काढून पाठवतो.धनवान कुटूंबात वाढलेल्या कांतीला नातेवाईकांसमोर अपमानस्पद वाटते .तिला रविंद्रच्या साध्या स्वभावाची चीड येत राहते.अशातच दिल्लीतील लहानपणीची मैत्रीण शीतलची भेट होते.तिच्या स्वतःच्या उच्चभ्रू राहणीमानाचा कांतीला हेवा वाटतो.शीतल कांतीला स्त्री-मुक्तीचे,स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे विचार सांगते.स्वतः आर्थिक सबळ होणे हे खूप गरजेचे आहे या धावत्या जगात. हे पटवून सांगत राहते.
दिल्लीतील हडसन येथील हॉटेलात पिझ्झा खाताना शीतल कांतीला सांगते,"सेक्स म्हणजे फन!नुसती गंमत!तहान लागल्यावर कोक प्यावा तसं किंवा भूक लागली की इथं हडसनला येऊन पिझ्झा खावा, तसं!"
पुढे म्हणते..
"इथं मनापासून पिझ्झा खाल्ला ,याचा अर्थ माझी माझ्या किचनवर निष्ठा नाही,की काय?माझा माझ्या स्वयंपाकघरावर किती जीव आहे.हे तुला ठाऊक आहेच.आपल्या देशात पुरुषांनी हे जाणलंय. ते फन म्हणून त्याचा आनंद लुटत असतात!बिचाऱ्या बायकाच फक्त जुन्यापुराण्या विचारांना आणि भाव-भावनांना लटकत घुसमटत राहतात!"
यातून शीतल कांतीला हे सूचित करते की स्त्रीयांनी सुद्धा पती व्यतिरिक्त आपल्या आवडणाऱ्या पुरुषांशी सेक्स करायला हवा.याचा पुरस्कार करताना इथे ती दिसते.
यानंतर कांती सुद्धा शीतल सारखे विचार व कृती करण्याचा मानस व्यक्त करते.दोघी दिल्लीत कपडे बनवून अमेरिकेला पाठवायचा व्यवसाय करतात. ती पतिकडे बेंगलोरकडे जात नाही.आलिशान राहण्याचा ,विमानातून फिरण्याचा शौक सहज पूर्ण करत राहते.पैसा खूप कमवते. आपल्या मुलाला अनुपला विद्याशाळेनंतर म्हैसूरला इंजिनियरसाठी ऍडमिशन घेऊन देते.अनुपला आपल्या बापापेक्षा पैशाच्या आधारावर सहज काम करणारी आई प्रिय वाटू लागते.
साधी राहणीमान-उच्च विचारसरणी,गांधी-विवेकानंद यांचा आदर्श,ब्रम्हचर्य अशा संस्काराचा अनुप.शहरातील, कॉलेजमधील वातावरण बघून मुलीं आकर्षित करण्यासाठी सायकल मारण्याचा अनुभव असणारा अनुप आई कांतीकडे बुलेट घेण्यासाठी हट्ट करतो अन ती पूर्ण करते.रवींद्रला मात्र हे पटत नाही. त्याचा कांतीवर मुलाला चंगळवादाकडे प्रेरित करत आहे ,याचा राग येत राहतो.
बुलेट आल्यानंतर कॉलेजमधील रश्मी नावाची सुंदर मैत्रीण अनुपला मिळते.दोघेजण भरपूर पार्ट्या-बुलेटवर फिरणे नित्याचेच होते.एकेदिवशी तो तिला बेंगलोर येथील कॅबेरेत अंगप्रदर्शन करत डान्स करणाऱ्या तरुणींना पाहण्यास जातात.तेव्हा हे रश्मीला खूप आवडते.तीपण अनुपला टेपरेकॉर्डरवर आपला डान्स लॉजवर अंगप्रदर्शन करत दाखवत असते. तेव्हाच ती कॅबेरे मध्ये डान्स करण्याचा निश्चय व्यक्त करते. तसे अनुपला सांगते.तेव्हा अनुप तिला प्रखर विरोध करतो.आपल्या प्रेयसीने असे कपडे उतरून नाचलेले आवडणार नाही ,हे तिला ठणकावून सांगतो.पण आपल्या कलेपुढे त्याच्या विचाराला भीक न घालता युक्तिवाद करताना त्याला सांगते,"एवढ्या लोकांपुढे कपडे उतरवणं वाईट असेल,तर एवढ्या लोकांनी ते पाहणं वाईट नाही का?एवढ्या वेळा कॅबेरे बघणारा तू कसा चांगला ठरतोस मग!शिवाय हॉटेलमध्ये मी केलेला कॅबेरे बघणारा तुही वाईटच ना?"
पुढे हे ही सांगते की,"चित्रकार आपली कला हजार वर्ष दाखवू शकतो;शरीराचं सौंदर्य मात्र तारुण्य असेपर्यंत दाखवणं शक्य आहे."
हा संवाद वाचल्यानंतर आपली आई, बहीण,मुलगी,पत्नी सोडून स्त्रीकडे चुकीच्या नजरेतून बघण्याचा आपला दृष्टिकोन ठळक अधोरेखित होतो अन ती नैतिकतेचा आपला बुरखा फाडते.
अनुप मात्र विरोध करण्याच्या पुरुषी वृत्तीवर ठाम राहतो.रश्मी आपल्या कलेसाठी त्याचा संबंध सोडते.एकाकी असताना अनुप स्वतःशीच संवाद साधताना म्हणतो, "ब्रम्हचर्याच्या टोकाच्या कल्पनेत तडफडत मनाची फरपट करण्यापेक्षा शरीराच्या मागणीचा आदर करून शांतपणे अभ्यास करणं का अयोग्य ठरावं?"असा विचार करून दुसऱ्या मैत्रिणीशी लैंगिक संबंध ठेवत राहतो.नंतर नंतर एका खेड्यातील अडाणी सुंदर मुलीशी पैसेदेऊन संबंध ठेवतो.ती मुलगी गरोदर होण्याचेही प्रकरण घडते.अनुपची आई कांती हे प्रकरण पैसे देऊन मिटवते.अशावेळी वडीलांच्या वर्तमानपत्रामधून मुलाची बाजू न घेताही यावर लेख लिहिले जातात.आई मात्र पांघरूण टाकण्यासाठी पैशाचा वापर करते. तेव्हा हे असे गरीबांचे चारित्र्य विकत घेणे हे आजचे नाही,हे लक्षात येते.
अनुपचे गरोदर प्रकरण शिवराज या अमेरिकेतून शिक्षण घेतलेल्या तरुण प्राध्यापकास समजते.आपल्या भारतात बलात्कार मोठ्या प्रमाणात का घडतात याचे उत्तर दोघाच्या संवादात दिसते.शिवराज अनुपला म्हणतो,"मनाला छळणाऱ्या कामवासनेला बाहेर पडायला मार्ग असेल,तर समाजजीवन शांत राहतं!याच मूलभूत सत्यावर त्यांचा(अमेरिकेचा)समाज उभा आहे!आपण ती भावना दडपून टाकणारी नीती स्वीकारली आहे,म्हणूनच आपला समाज मागं राहीला आहे!"
लहानपणी विद्याशाळेत असताना इंजिनिअर बनून देशातील गरीबांसाठी योगदान देण्याचे मनोदय व्यक्त करणाऱ्या अनुपला भारत देश मागास विचारसरणीचा, इथे बदल अशक्य आहे असे मनात विचार आणून शिक्षणाच्या नावाखाली अमेरिकेलाही जातो.अन लहानपणाच्या संस्काराचा काहीच फायदा नाही,धावत्या जगात.हे पण अधोरेखित होते.
दुसरीकडे दिल्लीत असणारी कांती आता रविंद्रला म्हणजे पतीला विसरून गेली होती.त्याचवेळी विद्याशाळा सोडून दिल्लीला आलेला हेमंत होन्नती हा सतारवादक तिच्याच वयाचा .तिलाही संगीत ऐकण्याची खूप आवड असते.लग्न न केलेल्या तरुणाशी पुन्हा पुन्हा भेट होत राहते.हेमंतने आपल्या कलेसाठी उच्चशिक्षणावर पाणी सोडलेले असते.तो बेंगलोर पासून जरा दूर असलेल्या खेड्यातील विद्याशाळाजवळ असणाऱ्या डोंगरावर सतार वादनाची साधना करत असत.शाळेतील मुलांनाही शिकवत.त्यामुळे तिथेच अनुप,रविंद्र आणि कांताची ओळख झालेली.हेमंत रवींद्रला मोठ्या भावाप्रमाणे मानत असत.
दिल्लीमध्ये हेमंत परतल्यानंतर त्याच्या सतार वादनसाठी कांती मदत, गुंतवणूक करू लागली. त्याचेच रूपांतर प्रेमात झाले नंतर लैंगिक संबंध ठेवण्यापर्यंत.
धार्मिक स्वभावाच्या हेमंतला आपण खूप मोठी चूक केली आहे.मोठ्या भावासमान असलेल्या रविंद्र यांच्या पत्नीशी असे संबंध ठेवायला नको होते.हे सतत त्याला जाणीव होत होती. पण कांती त्याला मी स्वतंत्र स्त्री आहे.मी आता रविंद्रची पत्नी नाही हे समजूत काढुन संबंध तसेच चालू असायचे. अशीच एकदा त्याच्या मनोवृत्तीवर उपाय काढताना कांती हेमंतला म्हणते, "समाजातील कुब्ज नीती-नियमांचे विचार फेकून दिल्याशिवाय कलेच्या अथांग अवकाशात भरारी घेणं कसं शक्य आहे?"
असं सांगताना कोणत्याही कलेला प्रणयही तेवढाच आवश्यक आहे.हे ते स्पष्ट करते.
अशी कितीही समजूत काढली तर तिचा पती रविंद्र यांची आठवण आली की हेमंतला खूप अपराधी वाटत.असच एकदा यावर वादविवाद करताना कांती म्हणाली, "तू माझ्याकडे वेश्या म्हणून बघतोस काय!"अशा अर्थाने भांडण वाढत जाते.अन ते एकमेकांचे संबंध तोडतात.तेव्हा हेमंत मनाशी बोलतो,"मी तिच्याकडे वेश्या म्हणून बघतो ,असा तिनं माझ्यावर आरोप केला.पण हिनं तर मलाच पुरुष वेश्या म्हणून वापरलं आहे!"
हे वाक्य वाचल्यानंतर विचारशील वाचकाला हेमंतचा हा मुद्दा विचार करण्यास भाग पाडतो.
नंतर कांतीशी संबंध तोडल्यानंतरही हेमंत याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी अध्यात्मची जाण असणाऱ्या आपल्या लैंगिक संबंधाबाबत विचारत.तेव्हा त्याला कृष्ण-राधेचा प्रणय हा संदर्भ मिळत.एके दिवशी हाच मुद्दा दहनविधी क्रिया पार पाडणाऱ्या महाराजाला तो विचारतो.तेव्हा तो हेमंतला सांगतो,"आपल्याला कृष्णविषयी कुठल्या-कुठल्या मूळ ग्रँथामधून समजतं?महाभारत, हरिवंश,भागवत आणि विष्णु-पुराणातुन, तर या ग्रँथामध्ये कुठंही राधेचा उल्लेख नाही."
म्हणजे याचा अर्थ असा निघतो की अनैतिक लैंगिक संबंध झाकण्यासाठी कृष्ण-राधेचा वापर झालेला आहे.याला पुष्टी देताना ते महाराज पुन्हा म्हणतात की,"राधा कृष्णापेक्षा मोठी आहे.आपल्यापेक्षा प्रौढ स्त्रीशी समागम केला तर आयुष्य घटतं आणि लहान स्त्रीशी केला तर आयुष्य वाढतं, हा हिंदूंचा विश्वास आहे."
हे वाक्य हिंदु धर्मात खरं ठरलेलं आजही वाटतं. कारण विवाह करताना पुरुष कमी वयाच्या स्त्रीची निवड करतो. आजची ही परंपरा मान्य करून त्याकाळी कृष्णाने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या राधेशी प्रणय केला नसणार. हे या वाक्यावरून वाचक असा तर्क काढतात.
हेमंतने संबंध तोडल्यानंतर ती एकाकी पडते.हरिशंकर या सतारवादनाच्या विख्यात पण स्रियांचा नाद असलेल्या व्यक्तीशी संबंध जोडते.तोपण तिची फसवणूक करून सोडतो.

त्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये भागीदार असणारी कांतीची मैत्रीण शीतल हिला भागीदारीतून काढण्याच्या रागातून सुडापोटी कांतीचे-हेमंतचे लैंगिक संबंध स्पष्ट करणारे निनावी पत्रे पती रविंद्रला ,मुलगा अनुपला,हेमंतच्याआई-वडिलांना पाठवते.रविंद्र तिला तू अशी का वागली म्हणून जाब विचारतो.ज्या मुलाला पाहिजे तेवढा पैसे पुरवला ,त्याचे अनैतिक कारनामे झाकलेल्या आईला चापट मारून अनुप जाब विचारतो.ते दोघेही नंतर तिचे स्त्री म्हणून स्वतंत्र अस्तित्व मान्य करतात.
..एवढा पैसा मिळवूनही ती शेवटी एकाकी होते.पण तिच्याकडे संशय नजरेने पाहणाऱ्या वाचकांना या कादंबरीतीलच एक वाक्य तेवढंच आत्मपरीक्षण करायला लावते.
"नात्यामध्ये पुरुषानं पुढाकार घेतला ,तर क्षम्य;आणि स्त्रीनं पुढाकार घेतला ,तर पाप?"
©सौदागर काळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा