आजही ..लहानपणीचे दिवस आठवले की,हसू येतं.गुरूजींच्या पाठीमागे दररोज एक प्रतिज्ञा म्हणायचो."भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत". त्या लहानपणाच्या भोळया मनाला याचा अर्थही समजत नव्हता. आज मात्र, आपण सारे भारतीय बांधव आहोत. हे लहाणपणी खोटं म्हणून घेतलं जात होतं, हे सत्य समजतं.
हे वास्तव सत्य समजण्यास सर्वस्व सरकारच गुन्हेगार होतं.शाळेमध्ये नाव घालताना दाखल्यावरची जात बघत होतं अन् त्याच शाळेमध्ये आम्ही स्वातंत्र्य,समता,न्याय,बधुंता आणि धर्मनिरपेक्षता ही तत्वे शिकत होतो.
जेव्हा मी दहावीमधून अकरावीला गेलो तेव्हा महाविद्यालयात शास्त्र, वाणिज्य शाखांची ' मेरिट' लिस्ट दिसली.खरंतर माझ्या मते,ती एक 'कास्ट'लिस्ट होती.तेव्हा क्षणभर आपल्या गुणवत्तेसमोर'मराठा'ही जात आडवी आली असंही वाटलं.तेव्हापासून आतापर्यंत 'खुला प्रवर्ग 'म्हणून खुल्या आकाशाखाली जीवन जगतो आहे.मग वाटलं सरकारला राज्यघटनेतील 'न्यायाचं तत्त्व' शिकवायला हवं.म्हणून..मी मोर्चात सामील झालो.
जेव्हा मी एकटा असाच विचार करत बसत असतो .तेव्हा या सरकारचं काहीच मला समजत नाही.एकीकडे 'सर्व शिक्षा अभियान' चालू करायचे अन् दुसरीकडे आम्ही पदवी,पदव्युत्तर शिक्षण घेऊनही आम्हांला नोकऱ्या नाहीत म्हणून माझे बांधव दहावीनंतर गुणवत्ता असूनही मोलमजुरी करताना पाहिल्यास सरकार हे कोणतं 'शिक्षा' अभियान राबवत आहे ,हे कोडं उलगडतच नाही पण समाजात शिक्षणाच्याबाबतीत कुठेही कमी पडू नये म्हणून माझ्या बांधवानी जमिनीसुध्दा विकल्या.आता जगण्यासाठी जमीनही नाही अन् तुमची नोकरीसुध्दा नाही.नेहमी एक वाक्य कानावर पडत आलंय,'बरं का?मुलांनो!सरकार आपलं माय-बाप असतं'.सरकार खरंच माय-बाप असेल तर मग एका मुलाला खाऊ घालायचं अन् दुसऱ्या मुलाला तो मोठा आहे म्हणून उपाशी ठेवायचं,असं कुठले तरी माय-बाप करतात का? सरकार विसरलं की काय पालकाची भूमिका!की विसरलं राज्यघटनेतील 'समता'हे तत्त्व.हेच सरकारला शिकवावं म्हणून..मी मोर्चात सामील झालो.
आताही वाटतं आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं शिकायला हवं,पण त्यांना जसं गुणवत्तेसमोर जातीचा विचार न करता शाहू महाराज,सयाजीराव गायकवाड़ यांनी आर्थिक पाठबळ दिलं होतं,तसं सरकारनं आर्थिक दुर्बलांना द्य्यायला हवं याचा विसर पडला की काय? की त्यांची दूरदृष्टी अंधुक झाली.मला आजही वाटतं ,आपण भारतीय आहोत,भारतीय म्हणून मरायला हवं.पण तुमची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी जात विचारून उगीच जाती-धर्मात राजकारण घडवून आणते तेव्हा राज्यघटनेतील 'धर्मनिरपेक्ष'तत्त्वाचं काय?कशी निर्माण होईल आमच्यात बंधुता ?जाती-धर्माच्या रक्तासाठी माझं भारतीय रक्त आता कमी कमी होत चाललं आहे.राज्यघटनेतील 'धर्मनिरपेक्ष','बंधुता' हे तत्त्वे सरकारला शिकवण्यासाठी म्हणून.. मी मोर्चात सामील झालो.
मी आता ज्या क्षणी लिहित आहे त्या क्षणापर्यंत माझ्या माता-भगिनींवर अत्याचार झालेत.अत्याचार करणाऱ्याला जात नसते,पण अत्याचार सहन करणाऱ्यास जात असते.आयुष्यात शेतकऱ्यांना बेरजेचे अर्थकारण कधीच जमलं नाही ,पण तुमच्या बेरजेच्या राजकरणासाठी शेतकर्यांचा बळी जात राहिला.आताच आरक्षणासाठी आमच्या एका बांधवाने आत्महत्या केली.हे सर्व अत्याचार करणाऱ्यांसाठी,व्यवस्थेचे बळी ठरून आत्महत्या करणाऱ्यांसाठी राज्यघटनेने दिलेल्या 'स्वातंञ्याचा' दुरूपयोग शेवटचा ठरावा म्हणून..मी मोर्चात सामील झालो.
गौतम बुध्द आणि महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही मोर्चे काढत आहोत.हे मोर्चे वादळापूर्वीची शांतता ठरू नये.ती कायम शांतता राहावी म्हणून..मी मोर्चात सामील झालो.
सौदागर काळे,पंढरपूर.
म्हणून..मी मोर्चात सामील झालो.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
गांधी फेलोशिप प्रवास.....
गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...
-
तंतूच्या महावस्त्रातून : स्त्री-पुरुष संबंधाचा दिसलेला धागा….. तंतू ही कन्नड साहित्यिक एस.एल.भैरप्पा यांची कादंबरी. या कादंबरीचा मरा...
-
_...हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झालो._ (छायाचित्र:गुगल) आपण घरात बसल्यानंतर कोणीतरी खिडकीतून डोक...
-
प्रिय दाभोळकर, तुमच्या देहाला मारून आता चार वर्षे होत आहेत.तुमचा मारेकरी अन आमच्यातली अंधश्रद्धा दोघेही दरोडेखोर असल्यासारखे ...