फुटू दे दगडांना पाझर...... "माणसं सतत जग बदलण्याची भाषा करतात,पण स्वत:ला बदलण्याबद्दल मात्र कोणीच बोलत नाही."असं लियो टॉलस्टाय नावाचा थोर विचारवंत म्हणतो. टॉलस्टाय जसं म्हणतो तसंच आमचं झालं आहे.2 ऑक्टों,2014 रोजी महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना आवहान करतात की,"मी कचरा करणार नाही,इतरांना करू देणार नाही." पण आम्ही,"मी कचरा करणार,पण इतरांना करू देणार नाही." असं वागतो.इथे आम्ही टॉलस्टायच्या विधानाचा अर्थ विविध प्रकारे आजही वास्तवात आणतो आहे. सद्या भारतात फक्त कचऱ्याचा प्रश्न नाही तर प्रत्येक क्षेत्रात आज कचरारूपी समस्या आ वासून उभ्या आहेत. अणुअभियंते अनिल काकोडकर यानांच कचऱ्याचा प्रश्न न सुटल्याची लाज का वाटावी?प्रत्येक मुंबईकरांना कचरा रस्त्यावर टाकताना जेव्हा स्वत:ला लाज वाटेल,तेव्हा देवनार कचराभूमी डोंगर होण्यापासून वाचेल. आपल्या राज्यकर्त्यांना लाज कशाची वाटायला हवी अन् अभिमान कशाचा बाळगायला हवा हेच समजत नसेल तर त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा करणं ही आपल्या आखूड बुद्धीच लक्षण नव्हे का? लातूरला कमी वेळेत रेल्वेने पाणीपुरवठा केला,याचा अभिमान मिरविणारे,पोस्टरबाजी करणारे राज्यकर्ते दुसऱ्या बाजूला आपल्या बांधवाना ही वेळ का आली? याची लाज न बाळगता आपल्या बेफिकीरपणाचं प्रदर्शन जगासमोर करत आहेत. आपण आपल्या घरातील कचरा ज्या सहजतेने रस्त्यावर टाकतो, त्याच सहजपणे आम्ही कचरारुपी लोकप्रतिनिधी प्रत्येक निवडणुकीत निवडून देतो,या साऱ्या समस्याचं मूळ आमच्या लोकशाही स्वातंत्र्यरूपी हक्कात येतं याची लाज कधीच आम्हां वाटली नाही. ज्योतिषाच्या सांगण्यानुसार आपल्या आलिशान गाडीचा क्रमांक बदलणारे धनिक अन् त्याच देशात किती दिवस जगण्याचा आकडा गाठू? या विवंचनेत उपाशी झोपणारे गरीब;ही खोल दरी पाहण्यासाठी पर्यटनाप्रमाणे राज्यकर्ते वर्षानुवर्षे पर्यटकाची भूमिका बजावत असतील तर तुमच्या माझ्या सारख्यां दगडांना आता पाझर फुटू दे... म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आमच्या ग्रामीण भागातील चित्र तर खूपच विचित्र!क्षणाक्षणाला लाज वाटणाऱ्या घटना घड़तात पण आम्ही हे सहन करायला संवेदनाहीन दगड झालो आहे हे नक्की . आजच्या दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरणारे आम्ही;जिथे पाणी दिसेल तेथून पाणी आणत आहोत.मिळेल ते पाणी पिण्यासाठी वापरत आसताना ते शुद्ध आहे की अशुद्ध;हे बाटलीबंद पाणी पिणाऱ्या पुढाऱ्यांना कसं कळणार?आम्ही कित्येक आजारांना आमंत्रण देतो आहोत हे आम्हांला दवाखान्याची पायरी चढल्यावरच समजतं. आमचा ग्रामीण भागातला बाप 'सरकारमान्य देशी दारुचे दुकान' हा फलक लावलेल्या दुकानात दारू पितो अन् त्याचीच मुलं 'विनाअनुदानित शाळेत शिक्षण'घेताना दिसतात; याची लाज ना दारू पिणाऱ्याला ना सरकारला ! सद्यस्थितीत विद्यापीठातून पदव्यांचे प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडणारे हजारो विद्यार्थी कचऱ्यासारखे निरुपयोगी ठरत आहेत,याची लाज नेमकी विद्यापीठाला वाटायला हवी की;गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या प्राध्यापकांना? आमचा देश जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून नाव मिरवतो पण त्याच लोकशाही देशात महिलांना समान हक्कासाठी आजही लढ़ा द्यावा लागतो;नेमका हा लढा कोणत्या ‘शाहीत’मोडतो याचं विवेचन सरकारनं जगाला लाज बाळगत द्यावं म्हणजे भारत’माता’ की जय! म्हणताना आम्हाला संकोच वाटणार नाही. ‘मन की बात’ मध्ये नरेंद्र मोदी आपल्या देशाला ऑलिंपिंक मध्ये पदके कमी मिळतात याची लाज वाटते हे जगजाहीर करतात ,पण आमचा शेतकरी आत्महत्या करण्यात विक्रमच्या विक्रम प्रस्थापित करत आहेत,याचा अभिमान त्यांना वाटतो की नाही? सारंच कसं आलबेल नाही का! आपल्या देशात लाज वाटणाऱ्या अनेक समस्या आहेत.याचं मूळ संत कबीर म्हणतात तसं आपल्यात आहे."जो मन खोजा आपना,तो मुझ से बुरा न कोय" या उक्तीचा अर्थ आत्मसात करून तुमच्या माझ्या सारख्या दगडांना अशा प्रखर दुष्काळतही फुटू दे पाझर..... सौदागर किसन काळे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
गांधी फेलोशिप प्रवास.....
गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...
-
तंतूच्या महावस्त्रातून : स्त्री-पुरुष संबंधाचा दिसलेला धागा….. तंतू ही कन्नड साहित्यिक एस.एल.भैरप्पा यांची कादंबरी. या कादंबरीचा मरा...
-
_...हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झालो._ (छायाचित्र:गुगल) आपण घरात बसल्यानंतर कोणीतरी खिडकीतून डोक...
-
प्रिय दाभोळकर, तुमच्या देहाला मारून आता चार वर्षे होत आहेत.तुमचा मारेकरी अन आमच्यातली अंधश्रद्धा दोघेही दरोडेखोर असल्यासारखे ...