हुनर खोज संवाद यात्रा-आसाम

# *हुनर खोज संवाद यात्रा*
# *आसाम*
# *दिवस दुसरा:21 नोव्हेंबर.*

                
       माणसं मेल्यानंतर स्वर्गात    जाण्याची स्वप्ने पाहतात. भारतात सुद्धा काही असे स्वर्ग आहेत.म्हणून जिवंतपणी स्वर्ग पाहायचा असेल तर नॉर्थ इस्ट राज्यात एकदा यायलाच हवे.
     
         सकाळी सात वाजता आम्ही एका आदीवासी गावाकडे निघालो.या गावाकडे जाताना जे निसर्गाचे दर्शन होते.ते खूप विलोभनीय आहे.
  ‎    
  ‎   संपूर्ण आसामाच हिरवाईने नटलेला आहे.इथं फक्त निसर्गाचाच शो आहे. त्यामुळे चुकूनसुद्धा झाडे नसलेला प्रदेश दिसणार नाही.आपल्या सारखा इथं ग्रामीण भाग असेल अशी कल्पनासुद्धा करू नये.गुवाहाटी शर जेवढे विकसित झाले तेवढा ग्रामीण भागातला विकास नाही.हे चित्र देशात सर्वत्र आहे, त्यामुळे हे काय विशेष नाही.
  
     ‎आम्ही गुवाहाटी पासून 150 किमी च्या आसपास असलेल्या उलीकुंची या गावाकडे निघालो. इकडे जाताना पूर्णपणे आपल्याला डोंगरातून जावे लागते. रस्त्याकडेचा प्रत्येक भाग हा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासारखा आहे.मोठ्या प्रमाणात बाबूंचे वृक्ष आहेत. आम्ही एका मोठ्या जंगलातून सफर करत आहे याचा भास नक्की होत होत होता.येथून जवळच काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य आहे.
  ‎
  ‎    नॉर्थ इस्टचा अरुणाचलचा थोडा वरचा पर्वतीय वनस्पतींचा भाग सोडला तर बाकी सर्व उष्णकटिबंद पर्जन्यीय जंगलाचा भाग आहे.आसामचा येथील प्रदेश जरी डोंगराचा असला तर येथील लोक भाताची ,चहाच्या मळ्याची शेती करतात.ब्रम्हपुत्रा नदीमुळे येथील सर्व भाग सुजलाम सुफलाम दिसतो.

      ‎आम्ही इथे पर्यटन करण्यासाठी आलोच नाही पण या गावाकडे जाताना जे लोकांच्या राहणीमानाचे,शेताचे,वळण वाटांचे,विविध पक्ष्यांच्या आवाजांचे, डोंगरावरून दिसणारी विरळ स्वरूपात पसरेल्या झोपड्या, यांचे जे दर्शन होत राहते ते पर्यटन स्थळापेक्षा कमी नाही.खरं सांगायचं झालं तर येथील हिरवागार निसर्गपाहून ऊर भरून येतो.
 
     ‎काही गोष्टी फक्त निरीक्षण करत करत दोन डोंगर ओलांडून त्या गावात आम्ही पोहोचलो.उलीकुंची या गावात शाळा, हायस्कूल ,लहान दवाखाना,लहान दुकाने,बऱ्यापैकी तेथील मनाने इतरांपेक्षा विकसित झालेले गाव आहे. कदाचित हे गाव पंचक्रोशीतील महत्त्वाचे गाव असेल.
  
         ‎येथील शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मदतीने काही पाड्यावर असणाऱ्या कारागिरांचा पत्ता मिळाला.सोबत मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी सोबत होता.त्याच्या मदतीने प्रत्येकाच्या घरी जात राहिलो.पण लोक शेतात पहाटे चारच्या आसपास शेतात काम करण्यासाठी जात असल्याने घरी फक्त लहान मुलेच दिसत .
 
      ‎एका कारागिराच्या घरी जाताना आमचा खूप कस लागला कारण त्यांचे घर उंचावर होते त्यानिमित्ताने ट्रेकिंगचा अनुभव आला.
  ‎
        आम्ही गुवाहाटी शहरातील वस्तुसंग्रलयात ज्या बांबूपासून हस्त कलाकृती बनवलेल्या पाहिल्या त्या वस्तू बनवताना आज इथं पहिल्या.त्याचबरोबर रेशीम धाग्यापासून साडी,कापसापासून दोरा आणि  विशिष्ट हस्त कलेपासून एका कारागिराने बनवलेले धान्याच्या साहाय्याने,गांधीजी,विविध प्रकारची खेळणी हा सारा त्यांच्यातील हुनरपणा पाहून आम्ही केलेल्या प्रवासाची चीज झाली.
  ‎
  ‎      येथील शाळेत गेलेले आदिवासी लोक   असमिया व स्थानिक बोलीभाषेनंतर इंग्रजी बोलतात.हे विशेष. मिशनरी शिक्षणाचा प्रभाव आहे ,हे यातून समजलं.प्रत्येक घरासमोरील स्वछता पाहून खूप मन प्रसन्न झाले.
  
      ‎भारतातील चांगल्या रस्त्यावर खड्डे आहेत.मग अशा दुर्मिळ भागातील परिस्थिती काय असू शकते,याचा विचार न केलेलाच बरा.
इथे 5 च्या दिवस मावळत असल्याने  ‎ आदिवासी कारागीर लोकांची माहिती घेऊन गुवाहाटीकडे परतीचा प्रवास सुरु केला.

         ‎दिवसभराच्या निसर्गाचं वर्णन या बालकवींच्या शब्दात करायलाच हवे......

ऐल तटावर पैल तटावर
‎ हिरवळी घेऊन
निळासावळा झरा
वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले
पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली
हिरवी गर्दी पुढे (कर्मश:)

*© Saudagar kale.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...