गोरखपूर बाल हत्याकांड
एका अपत्याला जन्म
देताना...
किती असह्य वेदना असतात
त्या आईच्या..
त्या गाईंच्या तुलनेत?
जाऊ दे ..तरुणा;
हे तुला ..कळणार नाही!
त्या बालकांचा नि:शब्द
हुंकार
'मन की बात'नाही झाला
'वंदे मातरम' सुद्धा म्हणायला
ऑक्सिजन नाही मिळाला.
जाऊ दे तरुणा;
हे तुला ..कळणार नाही!
स्वातंत्र्यलढ्याची पाने उलगडताना
'जालियनवाला बाग हत्याकांड'आठवला
त्यांची जगण्याची 'वाट' बंद करणारा
जनरल डायर हसताना दिसला
ही ऐतिहासिक दुःखद घटना होती.
जाऊ दे तरुणा;
हे तुला ..कळणार नाही!
न्याय ,स्वातंत्र्य,बंधुता
जात-धर्म काय असतं?
हे समजायच्या अगोदरच
त्यांचा जगण्याचा
मूलभूत हक्क हिरावला
"गोरखपूर बाल हत्याकांड"
नावाचा एक नवा धडा मिळाला.
जाऊ दे तरुणा;
हे तुला ..कळणार नाही!
'मेरा भारत महान','मेरा भारत महान'
असं म्हणणारा मी
आता निःशब्द झालोय
फक्त कानाजवळ आवाज येतोय...
"मेरा भाजप महान","मेरा भाजप महान"
जाऊ दे तरुणा;
'हे ही..तुला ..कळणार नाही'!
(छायाचित्र सौजन्य-गुगल)
एका अपत्याला जन्म
देताना...
किती असह्य वेदना असतात
त्या आईच्या..
त्या गाईंच्या तुलनेत?
जाऊ दे ..तरुणा;
हे तुला ..कळणार नाही!
त्या बालकांचा नि:शब्द
हुंकार
'मन की बात'नाही झाला
'वंदे मातरम' सुद्धा म्हणायला
ऑक्सिजन नाही मिळाला.
जाऊ दे तरुणा;
हे तुला ..कळणार नाही!
स्वातंत्र्यलढ्याची पाने उलगडताना
'जालियनवाला बाग हत्याकांड'आठवला
त्यांची जगण्याची 'वाट' बंद करणारा
जनरल डायर हसताना दिसला
ही ऐतिहासिक दुःखद घटना होती.
जाऊ दे तरुणा;
हे तुला ..कळणार नाही!
न्याय ,स्वातंत्र्य,बंधुता
जात-धर्म काय असतं?
हे समजायच्या अगोदरच
त्यांचा जगण्याचा
मूलभूत हक्क हिरावला
"गोरखपूर बाल हत्याकांड"
नावाचा एक नवा धडा मिळाला.
जाऊ दे तरुणा;
हे तुला ..कळणार नाही!
'मेरा भारत महान','मेरा भारत महान'
असं म्हणणारा मी
आता निःशब्द झालोय
फक्त कानाजवळ आवाज येतोय...
"मेरा भाजप महान","मेरा भाजप महान"
जाऊ दे तरुणा;
'हे ही..तुला ..कळणार नाही'!
(छायाचित्र सौजन्य-गुगल)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा