📒तो सध्या काहीच करु शकत नाही...

📒तो सध्या काहीच करु शकत नाही…

मन व्याकुळलेल्या 😒अवस्थेत
तो आजही पुस्तकांचे📖📚 ओझे
मेंदूत घेऊन,
नोकरीची 👷वाट बघतो आहे..

‘काय करतोस तू सध्या?’
एरव्ही तो 🚶गावकडे गेला असता
हमखास कानावर पडणारे हे शब्द
हाडे गोठवणाऱ्या थंडीतसुद्धा गरम👊 करतात..

“वाळुचे कण रगडिता रगडिता तेलही पडे”
या म्हणीप्रमाणे आयुष्य तिशीत येतं आहे
Mpsc-Upsc करत.. करत...
न राहवून...
तो सध्या कंडक्टरचा फॉर्म भरतो आहे..

‘तारीख पे तारीख’,📆 ‘तारीख पे तारीख’
जसं परिक्षांच्या Result बाबतीत घडलं..
तसचं सेम लग्नाच्या बाबतीत घडतं आहे.
तो सध्या गावाकडे शेती करतो आहे...

रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाने अन्
सशाच्या 🐇गतीने
तिनं संसार थाटला..
तो सध्या कासव होऊन प्रयत्न करतो आहे...

‘ती सध्या 👪काय करते…’
हे त्याला मनापासून माहित असूनही,
👩तिच्या आठवणीशिवाय..
तो सध्या काहीच करू शकत नाही…‍

            ✒ सौदागर काळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...